हातात तलवार घेऊन रोडवर दहशत निर्माण करणाऱ्यास अटक .

शहरात तलवार घेऊन फिरणारा एकजण जेरबंद
अहमदनगर : शहरातील गजबजलेल्या अशा बंगाल चौकी परिसरात हातात तलवार घेऊन रोडवर दहशत निर्माण करणाऱ्या एका इसमास कोतवाली पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. या प्रकरणी पोकॉ. सुजय विल्यम हिवाळे यांच्या फिर्यादीवरून जॉन कासिनो परेरा(वय ३४, रा. बंगाल चौकी, जि. अहमदनगर)याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, दि. ३० डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गुप्त
बातमीदारामार्फत कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संपतराव शिंदे यांना माहिती मिळाली की, नगर शहरातील बंगाल चौकी येथे एक इसम हातात तलवार घेऊन रस्त्यावर दहशत निर्माण करत आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या सुचनेनुसार कोतवाली पोलिस ठाण्याचे पोसई. मनोज कचरे, हवालदार
गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, सोमनाथ राऊत,अमोल गाढे, संदीप थोरात, योगेश खामकर यांच्या पथकाने छापा टाकून बंगाल चौकी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या जॉन कासिनो करेरा यास ताब्यात घेतले. त्याला तलवार कुठून आणली अशी विचारपूस केली
असता मला लोकांकडून धोका असल्यामुळे तलवार सोबत घेऊन फिरत असल्याचे पोलिसांना त्याने सांगितले. जॉन परेरा विरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोसइ. मनोज कचरे करीतआहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.