अहमदनगर . पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरातून५० लाख रुपयाच्याखंडणीसाठी तीन इसमांचा अपहरण करणाऱ्या आरोपींना नगरच्या स्थानिकगुन्हे शाखेच्या पोलिसांनी १२ तासांच्याआत जेरबंद करत अपहरण झालेल्या इसमांची सुखरुप सुटका केली आहे.
याप्रकरणी विवेकसिंग अनिलकुमार सिंग राजपुत (वय 23, धंदा बांधकाम व्यवसाय, रा.वसंतविहार,साकीनाका,
मुंबई) यांनी फिर्याद दिली. त्यांचे भाऊ नामे हर्षप्रताप महेंद्रप्रताप सिंग राजपुतआणि त्याचे इतर दोन साथीदार यांचेपन्नास लाखांच्या खंडणीसाठी मार्केटयार्ड परिसर, पुणे येथून अपहरण केल्याचं याफिर्यादीत म्हटलं आहे.
अपहरण करणाऱ्यांनी पैसे न दिल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेबाबत मार्केटयार्ड
पोलीस स्टेशन, पुणे येथे अनोळखी इसमांविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर खंडणी विरोधी पथक,युनिट-2, पुणे शहर हे सदर गुन्ह्याचा तपास
करत असतांना त्यांना सदर गुन्ह्यातील आरोपींनी अपहरण केलेल्या व्यक्तींना दौंडमार्गे- अहमदनगरच्या दिशेने घेवुन गेलेआहे, अशी माहिती प्राप्त झाली.
सदर माहिती प्राप्त होताच पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी पोलिस अधिक्षख राकेश ओला यांच्याशी संपर्क करुन सदर घटनेची हकिगत सांगुन आरोपींचा आणि अपहृत इसमांचा शोध घेण्याबाबत कळविले. श्री. ओला यांनी लागलीच एलसीबीचे पोनि अनिल कटके यांना
प्राप्त माहिती सांगून आरोपी आणि अपहृत इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले. या आदेशान्वये पोनि. कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील
सपोनि दिनकर मुंडे, पोसई सोपान गोरे,सफौ मनोहर शेजवळ, पोहेकॉ सुनिल चव्हाण, बापुसाहेब फोलाणे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, विश्वास बेरड,
पोना शंकर चौधरी, भिमराज खर्से, रविसोनटक्के,विशाल दळवी, संतोष लोढे,पोकॉ योगेश सातपुते, जालिंदर माने
आणि विनोद मासाळकर यांचे पथक नेमुन आरोपी व अपहरत इसमांचा शोध घेवुन कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस
अधिकारी आणि अंमलदार यांचे पथक नगर ते दौंड रोडने जावुन आरोपींची माहिती घेत असतांना पोनि. कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली
की, काष्टी येथे हॉटेलच्या रुममध्ये काही इसमांना डांबुन ठेवलेले आहे, आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. त्यानूसार पथकाने
हॉटेल परिसरात सापळा लावला असता आरोपींना पोलीस पथकाची चाहूल लागली मार्केटयार्ड परिसर, पुणे येथून अपहरण केलेल्या इसमांना राजश्री हॉटेलमध्ये ठेवले आहे, अशी कबुली दिली. त्यानुसार
शाह, करीम आणि ते हॉटेलच्या पाठीमागील बाजुने
पळून जाऊ लागले. पथकाने संशयित आरोपींचा पाठलाग करुन त्यांना शिताफीने
ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे विशाल बबनराव मदने (वय ३२,
रा. वांगदरी, ता. श्रीगोंदा), विजय लक्ष्मण खराडे (वय ३८, रा. श्रीगोंदा फॅक्टरी, ता. श्रीगोंदा) व प्रविण रंगनाथ शिर्के(वय ३८, रा. बाबुर्डी, ता.श्रीगोंदा) असे
असल्याचे सांगितले.त्यांच्याकडे मार्केटयार्ड परिसर,
जिल्हा पुणे येथील अपहरत इसमांबाबत विचारपुस करता त्यांनी समाधानकारक हॉटेलमध्ये जाऊन खात्री करता हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरील रुममध्ये काही इसम घाबरलेल्या स्थितीत बसलेले दिसूनआले. त्यांना त्यांचे नाव गांव विचारलेअसता त्यांनी हर्षप्रतापसिंग राजपुत,प्रतिष जगदाळे, किसनकुमार गुप्ता (रा.
साकीनाका, मुंबई) असे सांगितले. अपहृत इसम हेच असल्याची पथकाची खात्री तोहसीफ झाल्याने आरोपी आणि अपह्नत इसमांना मान्यवरांच ताब्यात घेऊन खंडणी विरोधी पथक, यावेळी ब युनिट-2, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आलं. आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाही. पुढील तपास खंडणी विरोधी पथक, युनिट-2, पुणे
शहर हे करीत आहेत.