नेवासा- डॉ.सौ.मनिषा वाघ यांना राजमाता जिजाऊ कार्य गौरव पुरस्कार प्रदान


नेवासा- डॉ.सौ.मनिषा वाघ यांना राजमाता जिजाऊ कार्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नेवासा प्रतिनिधी अमोल मांडण 
नेवासा येथील प्रसिद्ध स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ डॉ.सौ.मनिषा भाऊसाहेब वाघ यांना मराठा सुकाणू समितीच्या वतीने दिला जाणारा राजमाता जिजाऊ  कार्य गौरव पुरस्कार नुकताच शिवशाहीर कल्याणजी काळे यांच्या हस्ते  प्रदान करण्यात आला.
    नेवासा तालुक्यातील मक्तापुर येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी शिवशाहीर कल्याणजी काळे यांच्या हस्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव सरोदे, पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे,शिवशाहीर नानासाहेब कोलते,पोलीस पाटील अनिल लहारे, मराठा सुकाणू समितीचे प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे,सौ.संगिता झगरे,आदर्श शिक्षक शकुर ईनामदार,नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुधीर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
    रुग्ण सेवा हीच हीच ईश्वर सेवा समजून डॉ.मनिषा वाघ यांनी आतापर्यंत आरोग्य सेवा दिली आहे व देत आहे,नॉर्मल डिलीव्हरी करून  सर्वसामान्य भगिनींना दिलासा द्यायचे काम त्या आज ही करत असल्याने त्यांना हा पुरस्कार दिला गेला असल्याचे मराठा सुकाणू समितीचे प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
   डॉ.सौ.मनिषा वाघ यांना राजमाता जिजाऊ कार्य गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरावर अभिनंदन होत आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.