नेवासा- तालुक्यातील कुकाणा येथे होत असलेली शेतकरी लुट थांबवा - सरपंच शरद आरगडे
प्रतिनिधी अमोल मांडण
नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे कापुस व तुर खरेदी करणारे अनाधिकृत व्यापारी मोठ्या प्रमाणात शेतकरी माल खरेदीत लुट करत असल्याचे सौंदाळा गावचे सरपंच शरदराव आरगडे म्हटले आहे.
या बाबत सविस्तर घटना अशी कि सौंदाळा गावातील शेतकरी विठ्ठल पंडित यांनी आपल्या शेतात पिकवलेली तुर विक्रीसाठी कुकाणा येथे अभंग पेट्रोल पंप समोर असलेल्या गाळ्यातील व्यापारी शिरीष बोरा रा,भानसहिवरा यांचेकडे नेली सदर तुर वजन करत असताना शेतकरी पंडित यांना वजन काटा तफावत असल्याचा संशय आला म्हणुन सदर काट्यावर ५४ किलो भरलेली गोणी दुसरीकडे वजन करण्यासाठी नेली असता ते वजन ५९ किलो भरले तेंव्हा पंडित यांनी त्याच्या गावचे सरपंच शरदराव आरगडे यांना भ्रमणध्वनी वरुन संपर्क करुन हकिकत कळवली त्यानंतर सरपंच आरगडे यांनी त्या ठिकाणी येऊन काट्याची तफावत तपासली असता त्यात तथ्य असल्याचे लक्षात तसेच सदर व्यक्तिकडे तुर खरेदीचे लायन्सेस नसल्याचे दिसले म्हणुन नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री पालवे साहेब यांना संपर्क करुन लेखी तक्रार दिली आहे तसेच वजन काटा मापक कार्यालयाचे अधिकारी श्री सुनिल चित्ते यांचेकडे लेखी तक्रार करुन दुकान बंद करुन सदर व्यक्तिवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई करावी अशी मागणी केली आहे.