नंदकुमार पाटील मित्र मंडळाच्या वतीने नेवासा खडका रोडवर असलेल्या शरणपूर वृद्धाश्रमाला एक महिन्यासाठी पुरेल इतके किराणा साहित्य .

नेवासा- प्रतिनिधी अमोल मंडन
  लोकनेते स्व.मारुतराव घुले पाटील पतसंस्थेचे कर्मचारी व संस्थापक अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील मित्र मंडळाच्या वतीने नेवासा खडका रोडवर असलेल्या शरणपूर वृद्धाश्रमाला एक महिन्यासाठी पुरेल इतके किराणा साहित्य भेट देण्यात आले.

 माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त इतर खर्च टाळून वृद्धाश्रमात किराणा साहित्य देण्याचे ठरले.त्यानंतर हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी वृद्धाश्रमात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घुले पाटील पतसंस्थेचे नवनिर्वाचित संचालक मूर्तिकार बजरंग ईरले हे होते.तर जेष्ठ संचालक व्यापारी विजय गांधी,पतसंस्थेचे उपाध्यक्ष महंमदभाई टेलर शेख,संचालक राम कदम,कैलास बोरुडे, आण्णासाहेब जाधव,जनाब मोहंमंद नईमुद्दीन शेख,ज्ञानेश्वर ऊगले,व्यवस्थापक अंकुश धनक,सह व्यवस्थापक लक्ष्मण नाबदे यावेळी उपस्थित होते.यावेळी वृद्धाश्रम चालक रावसाहेब मगर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले वृद्धाश्रमाचे मार्गदर्शक व संपर्क प्रमुख पत्रकार सुधीर चव्हाण यांनी प्रास्ताविक करतांना नंदकुमार पाटील यांचे सामाजिक योगदान व जीवनकार्य विषद केले.
यावेळी वृद्धाश्रमासाठी वापरात येणारे उपयुक्त किराणा साहित्य वृद्धाश्रम चालक रावसाहेब मगर व वृद्धाश्रम कमिटीचे अध्यक्ष पत्रकार बाळासाहेब देवखिळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.यावेळी स्व. लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्थेचे उपाध्यक्ष महंमदभाई टेलर,व्यवस्थापक अंकुश धनक,कर्मचारी लक्ष्मण नाबदे यांनी मनोगत व्यक्त करत वृद्धाश्रमाला सतत सहकार्य करत राहू असे आश्वासन दिले.
यावेळी पतसंस्था कर्मचारी किशोर जाधव, विशाल जायगुडे, विनायक जाधव, प्रविण कोरेकर, कृष्णा आरले, अजय पारखे, आकाश लोखंडे, ज्ञानेश्वर लोखंडे, नदीम पठाण, गणेश परदेशी, अरुण गायके, विलास टेमक, नुमान शेख यांच्यासह लोकनेते स्वर्गीय मारुतराव घुले पाटील पतसंस्था कर्मचारी वृंद उपस्थित होते.लक्ष्मण नाबदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.