महिला नायब तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला; जाळून ...,.............,....मारण्याचा प्रयत्न
केज (बीड) : येथील
तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांच्या अंगावर अज्ञात व्यक्तींनी
ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी घडली. आशा वाघ यांच्यावर केजच्या उपजिल्हा
रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, संजय
गांधी विभागाच्या नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड या बीड रोडवरील बीएसएनएल टॉवरच्या
पाठीमागील भागातील त्यांच्या घरी दुपारचे जेवण करून तहसील कार्यालयाकडे येत होत्या. त्याच वेळी एका चारचाकी गाडीतूनआलेल्या त्यांच्या भावाची बायको
सुरेखा मधुकर वाघ, तिचा भाऊ
यापूर्वी ६ जून २०२२ रोजी केज तहसील कार्यालयात त्यांचा सख्खा भाऊ
मधुकर वाघ याने धारदार कोयत्याने खुनीहल्ला केला होता. त्यात त्या गंभीर
जखमी झाल्या होत्या. त्या प्रकरणी मधुकर वाघ
हरिदास भास्कर महाले आणि तिची आई मुंजाबाई भास्कर महाले आणि एक अनोखी महिला व वाहनचालक यांनी त्यांना रस्त्यात अडवून जळगाव जिल्ह्यातील दोनडिगर येथील जमिनीच्या हक्क सोड
पत्रावर सही करण्यासाठी जबरदस्ती केली. तसेच तुझ्यामुळे मधुकर वाघ हा जेलमध्ये असल्याने त्याची सुटका करण्यासाठी पोलीस केस मागे घेअसे म्हणून त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी त्या महिलांनी
त्यांच्या गळ्यात दोरीचा फास टाकून गळा आवळला. हरिदास महाले याने अंगावर पेट्रोलसदृश ज्वलनशील
पदार्थ टाकला आणि त्यांना पेटवून देण्यासाठी माचीस किंवा लायटर काढीत असताना नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांनी आरडाओरड करून बीड रोडवरील हॉटेल मधुबनच्या दिशेने पळाल्या.लोक जमा होताच हल्लेखोर चारचाकी गाडीतून पळून गेले.नागरिक त्याठिकाणी आल्यामुळे अनर्थ टळला.