नियोजन बैठक शांततेत
सोनई : शनि अमावस्या यात्रेत शनिवारी(दि.२१) होणारी विक्रमी गर्दी लक्षात घेऊन श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाच्या वतीने आयोजिच संयुक्त नियोजन बैठक
नुकतीच पार पडली.बैठकीसाठी नायब तहसीलदार सी.बी. बोरूडे, सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, तालुका आरोग्य अधिकारी अभिराज सुर्यवंशी, देवस्थानचे उपाध्यक्ष विकास बानकर, देवस्थानचे
मुख्य कार्यकारी अधिकारी जी.के. दरंदले,उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे उपस्थित होते. बैठकीत मंदिर परिसरात व रस्त्यांची माहितीची चर्चा होऊन वाहनतळ विषयी चर्चा झाली. शनिवारी पूर्ण दिवसाची अमावस्या
असल्याने भाविकांची विक्रमी गर्दी होण्याची
शक्यता आहे. बैठकीत भाविकांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. याप्रसंगी सहायक गट विकास अधिकारी सुरेश पाटेकर,
विश्वस्त बाळासाहेब बोरूडे, पोपट कुऱ्हाट,शिवाजी दरंदले, छबुराव भुतकर, संजय बानकर, डॉ. रावसाहेब बानकर, कामगार तलाठी श्रीकांत भाकड, महावितरणचे डी.डी. चिंधे, ग्रामसेवक बी.एन. बोरूडे, मुळा
कारखान्याचे सुरक्षाधिकारी आर.बी. जायगुडे
व देवस्थानचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित
होते.