प्रतिनिधी नेवासा- अमोल मांडण
नेवासा शहरातील गणपती चौक येथे तालुका विधि सेवा समिती नेवासा व नेवासा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरक्षा जागृती अभियान आज रविवार दि.२२ रोजी सकाळी ९.३०.वा राबवण्यात आले.या अभियानास विधी सेवा समिती अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.व्ही.वाय.जाधव साहेब, सह दिवानी न्यायाधीश श्री.ए.ए.पाचरणे साहेब, पोलीस निरीक्षक श्री.व्ही.एम.करे साहेब यांनी मार्गदर्शन केले.
रस्ते अपघातात आयुष्यात प्रत्येकाला दुसरी संधी देत नाही.त्यामुळे नियमाचे पालन करून वाहन चालवल्यास आपल्याबरोबर इतरांच्या जीवाला सुद्धा दुखापत होणार नाही. नियमांचे पालन करून वाहने चालवावीत. कायद्याने अठरा वर्षे पुढील व्यक्तीने वाहन चालवणे बंधनकारक आहे.प्रत्येक वाहनचालकाकडे परवाना असणे गरजेचे आहे.रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गत शहरातील गणपती चौक येथे झालेल्या अभियान अंतर्गत रस्ता सुरक्षा बद्दलची माहिती पोलीस निरीक्षक श्री.विजय करे यांनी दिली. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे.नियम पाळल्यास अपघाताचे प्रमाण निश्चितच कमी होईल असे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.व्ही.वाय.जाधव यांनी सांगितले. येणाऱ्या प्रत्येक वाहनचालकाला रस्ता वाहतुकीचे नियम समजून सांगण्यात आले व त्याची माहिती दिली.या अभियानास विधी सेवा समिती अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.व्ही.वाय.जाधव साहेब, सह दिवानी न्यायाधीश श्री.ए.ए.पाचरणे साहेब, पोलीस निरीक्षक श्री.व्ही.एम.करे साहेब व नेवासा पोलीस ठाण्याचे आदि कर्मचारी उपस्थित होते.