नेवासा प्रतिनिधी- अमोल मांडण
नेवासा- काँग्रेसचा सांस्कृतिक विभाग एक संघ राहावा यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सांस्कृतिक विभागाचे प्रदेश सचिव चंद्रशेखर पाटील यांनी निवेदन दिले.
महाराष्ट्रातील कॉंग्रेसचा सांस्कृतिक विभाग एक संघ रहावा या मुद्द्यावर सर्वांचे एक मत झाले.काल अहमदनगर येथे महाविकास आघाडीच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली होती.त्याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे ही उपस्थित होते. त्यावेळी त्यांना कॉंग्रेस सांस्कृतिक विभागाचे प्रदेश सचिव चंद्रशेखर पाटील यांनी निवेदन दिले.या निवेदनात म्हटले आहे की मी कॉंग्रेस सांस्कृतिक विभागाच्या प्रदेश सचिव पदावर कार्यरत असून सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने विनंती करतो की, आम्ही महाराष्ट्राच्या कॉंग्रेस सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्यक्ष विद्याताई कदम यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सेल वाढवण्याचे काम मोठ्या प्रमाणात करत आहोत.परंतु आम्हाला पक्ष वाढीचे काम करत असताना संस्कृतिकसेलचे तुकडे झालेले आहे.ते मोठा अडथळा ठरत आहे.या विभागाचे दोन अध्यक्ष, दोन जिल्हाध्यक्ष यामुळे सांस्कृतिक विभागाचे दोन भाग पडल्याने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना काम करताना मोठी अडचण येत आहे.तरी सर्वांच्या वतीने आणि अध्यक्ष विद्याताई कदम यांच्या माध्यमातून आपणास विनंती करत आहे की, संस्कृतिकसेल एक संघ ठेवावा व विद्याताई कदम एकच अध्यक्ष ठेवाव्या अशी विनंती निवेदनाद्वारे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना करण्यात आली.यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे, विनायक देशमुख, राष्ट्रवादीचे राजेंद्र फाळके, सेना शहराध्यक्ष संभाजी कदम, राष्ट्रवादी सरचिटणीस अशोक बाबर, जिल्हा सरचिटणीस सचिन गुजर, करण ससाने, प्रताप ढाकणे, अनुसूचित विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, महिला काँग्रेसच्या प्रदेश सदस्य शिल्पाताई दुशिंगे, संभाजी माळवदे आधी मान्यवरसह जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.