नेवासा- अमोल मांडण
नेवासा- तालुक्यातील सौंदाळा येथील आरगडे दांपत्याचे तीनही मुले देश सेवेत.
नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील श्री.रायभान आरगडे व सौ.निर्मला आरगडे या शेतकरी दांपत्यांनी तीनही मुलांना देश सेवा करण्यासाठी आर्मी मध्ये भरती करुन देशाप्रती आपले प्रेम दाखवुन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.
सौंदाळा गावातील रायभान आरगडे पिढीजात अल्पभुधारक शेतकरी होते.त्यामुळे शेतीवर कुटुंबाची व्यवस्थित आर्थिक घडी बसत नसल्याने ते कुकाणा भेंडा भानसहिवरे रांजणगाव येथील साप्ताहिक बाजारात पाल लावुन रेडिमेड कपडे किरकोळ विक्रीचे दुकान लावुन उदरनिर्वाह चालवायचे.
रायभान आरगडे यांना दत्ताञय व दिगंबर आणि योगेश असे तीन मुले आहेत मुलगी नाही.
समाजात आपण अनेक उदाहरण बघतो कि दोन मुले असतील तरी एक आर्मी तर दुसरा शेती किंवा घरी राहुन व्यवसाय करण्यासाठी पालक सांगतात कारण देश सेवा करताना कधी प्राण गमवावे लागतील हे सांगता येत नाही म्हणुन एक तरी मुलगा आपल्या जवळ पाहिजे अशी पालकांची भुमिका असते.
परंतु रायभान आरगडे यांनी तिनही मुलांना आर्मीत भरती होण्यासाठी सराव करायला लावला व तिनही मुले भरती देखील झाले अल्पभुधारक असलेले रायभान आरगडे यांना आर्मीत जॉईन झाल्यानंतर दिगंबर यांने फोन करुन सांगितले कि "नाना आता तुम्ही कपडे विक्रीचा व्यवसाय बंद करुन आराम करा अन्यथा आम्ही नोकरी सोडुन घरी येऊ" मुलांनी बापाचे कष्ट आपल्या डोळ्यांनी पाहिले होते म्हणुन चिंता करुन हे वाक्य वापरले आणि वडिलांनी देखील ऐकले.अल्पभुधारक आता ८ एकर क्षेञाचे मालक झाले आहेत तिनही मुले विवाहित असुन स्वत रायभान आरगडे हे पत्नी व तिन सुनांच्या सहाय्याने उत्तम शेती करतात.
तिनही मुले आळीपाळीने सुट्टी घेऊन शेती कामास हातभार लावत असतात संपुर्ण शेतीत ठिबक सिंचन बसविले असुन आधुनिक पध्दतीने ऊसाचे भरघोस उत्पन्न घेतले जाते.सौंदाळा गावचे रायभान आरगडे यांचे कुटुंबाचा आम्हाला अभिमान असुन ह्या कुटुंबाचा समाजाने आदर्श घ्यावा
गावात २६ जानेवारी किंवा १५ ऑगस्ट या दिवशी तिन मुलांच्या पैकी जो हजर असेल त्यांच्या हस्ते ध्वाजारहण कार्यक्रम करुन भारत मातेचा सन्मान करण्यात येतो अशी माहिती मा.सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितली.