नेवासा-अमोल मांडण
नेवासा-
पोलीस सूत्राकडून मिळाल्या माहितीनुसार, किशोर बहिरुनाथ कोकणे (वय २०वर्ष) रा.नेवासा बु.ता.नेवासा. जि.अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस स्टेशनला गु.र.नं. ५४/२०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे मोटर सायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय करे यांना गुप्त बातमीदारामार्फत खबर मिळाली की, सदरचा गुन्हा हा अनिल रावसाहेब बर्वे .गेवराई.ता.नेवासा. जि.अहमदनगर याने केला असल्याची माहिती मिळाली.पोलीस निरीक्षक यांच्या आदेशावरून नेवासा पोलीस स्टेशनचे पो.स.ई.समाधान भाटेवाल, से.फौ.बाळकृष्ण ठोंबरे, पो.ना.राहुल यादव, पो.ना.संजय माने, पो.कॉ.गणेश इथापे, पो.काॅ.श्याम गुंजाळ, पो.काॅ.अंबादास गिते व होमगार्ड प्रवीण वाल्हेकर यांना पथकसह रवाना करण्यात आले.
सदर पोलीस पथकाने गेवराई ता.नेवासा. जि.अहमदनगर येथे जाऊन सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्हा संदर्भात चौकशी तपास केला असता सदरील गुन्ह्यातील मोटरसायकल चोरल्याची कबुली त्याने दिली.गुन्हा करता वेळी त्याच्याबरोबर साजिद परवेश उर्फ पप्पू पठाण रा.खडका फाटा.ता.नेवासा. जि.अहमदनगर हा ही असल्याचे आरोपीकडून समजल्याने वरील आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी १४ मोटरसायकली चोरल्याचे कबुली दिली असून आरोपी कडुन सहा मोटरसायकली हस्तगत करण्यात आले असून उर्वरीत मोटरसायकलीचा तपासा दरम्यान हस्तगत करीत आहे. सदरची कारवाई ही अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला , अप्पर पोलीस अधीक्षक श्रीम स्वाती भोर मॅडम, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय करे, पो.स.ई.समाधान भाटेवाल, से.फौ.बाळकृष्ण ठोंबरे, पो.ना.राहुल यादव, पो.ना.संजय माने, पो.कॉ.गणेश इथापे, पो.काॅ.श्याम गुंजाळ, पो.काॅ.अंबादास गिते व होमगार्ड प्रवीण वाल्हेकर यांनी केली. पुढील तपासणी नेवासा पोलीस स्टेशनचे स.फौ. बाळकृष्ण ठोंबरे हे करीत आहे.