औरंगाबादहून नगरकडे जाणारा मालवाहतूक ट्रक दुभाजकावर नेवासा फाटा येथे चढला.

नेवासा फाटा : अहमदनगर-औरंगबाद जाणाऱ्यारस्त्याच्या महामार्गावरील नेवासा फाटा येथे
औरंगाबादहून नगरकडे जाणारा मालवाहतूक ट्रक रस्ता
दुभाजरकावर चढला त्यामुळे महामार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प झाल्याची घटना सोमवार (दि. २3) रात्रीच्या सुमारास 10 वाजता  घडली. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,औरंगाबादहून नगरच्या दिशेने चाललेला ट्रक दुभाजकावर चढला त्याला काढण्यासाठी आलेला क्रेन त्याला दुभाजकावरून काडीत असताना  ट्रक मध्ये लावलेले वायर रोप निसटून तुटल्यामुळे क्रेन चे नुकसान झाले असे अनेक अपघात या दुभाजकांमुळे नेवासा फाटा येथे कायमच होत असतात अनेक व्यवसायिकांनी या दुभाजक कायमचे काढण्याचे गरज आहे या दुभाजकामुळे अनेक अपघात होतात व ट्रॅफिक जाम होते यामुळे व्यवसायावर परिणाम होतो अशा प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली. 
 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.