नेवासा पोलीस निरीक्षक विजय करे यांना धक्का देऊन जखमी ज्ञानेश्वर महाविद्यालय जवळ घडली घटना.

नेवासा ( जि. अहमदनगर ) - पोलीस निरीक्षकास
धक्का देत पलायन केलेल्या दुचाकीस्वारांविरुद्ध नेवासा
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेत पोलीस निरीक्षक विजय करे जखमी झाले.
याबाबत पोलीस कर्मचारी दिलीप कुऱ्हाडे यांनी  फिर्याद दिली आहे
 ३ डिसेंबर रोजी सरकारी गाडीतून
शेवगाव पोलीस ठाण्याकडून नेवासा येथे येत असत
नेवासा फाटा-नेवासा रस्त्यावरील ज्ञानेश्वरकॉलेजजवळील रस्त्यावर एक पांढऱ्या रंगांच्या विन
नंबर पल्सर गाडीवर दोन जण बसलेले होते. मागील
महिन्यात कॉलेजवर झालेल्या भांडणाच्या अनुषंगा
विचारपूस करण्यासाठी पोलीस निरीक्षक
विजय करे यांनी पोलीस कर्मचारी कुऱ्हाडे यांना गाडी 
थांबविण्यास सांगितले. गाडीतून उतरून पोलीसनिरीक्षक करे हे सदर विना नंबर वाहनाबाबत व इथे का
थांबलात, अशी विचारपूस करत चालकास नाव- गाव
विचारले. यावर त्यांनी नाव न सांगता पोलीस निरीक्षक
करे यांना जोरात धक्का देत वाहन नेवासा शहराच्या
दिशेने पळविले. त्यावेळी पोलीस निरीक्षक करे हे 
रस्त्यावर पडल्याने जखमी झाले.
 येत असलेल्या विद्यार्थ्यांना विचारले
असता त्यांनी गाडी चालवत असणारा अरमान 
बागवान (रा.नेवासा बुद्रुक) व त्याच्या सोबत असलेल्याअरबाज रियाज सय्यद (रा. नेवासा खुर्द) असे नावे
सांगितले.त्यानंतर पोलीस निरीक्षक करे यांना
उपचारासाठी नेवासा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले
असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी अरमान जावेद बागवान (रा. नेवासा बुद्रु
व अरबाज रियाज सय्यद (रा. नेवासा खुर्द)  यांचे विरुध्द भारतीय दंड विधान
कलम 353, 279, 337 सह मोटार वाहन
कायदा कलम 184,50 (1) / 177 प्रमाणे
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.