नेवासा शिवसेनेचे नेते स्व. धर्मवीर अण्णा भाऊ लष्करे यांचे बंधू बिट्टू भाऊ लष्करे यांची येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे सुटकेनंतर राज्यात विविध ठिकाणी जल्लोष साजरा करून आपल्या नेत्याचं स्वागत अनेक ठिकाणी करण्यात आले पुणे,शिरूर सुपा,अहमदनगर ,येथे अनेक शिवसैनिक तसेच इतर पक्ष व विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी बिट्टू भाऊ लष्करे यांचे फुल पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन तसेच अनेक युवा तरुणांनी बिट्टू भाऊ लष्करे यांच्यासोबत फोटो सेशन करून सेल्फी काढून आपल्या नेत्याच्या स्वागताच्या पोस्ट आपल्या स्टेटस वर ठेवून आनंद व्यक्त केला तसेच नेवासा फाटा नेवासा मार्केट यार्ड येथे स्वागत करण्यात आले व हनुमान मंदिर येथे दर्शन घेऊन नेवासा बस स्टॅन्ड चौक येथे त्यांचे स्वागत नेवासा येथे फटाक्याची आतिषबाजी करून त्यांचे स्वागत नेवासा पुण्यभूमीत करण्यात आले .नेवासा बस स्टॅन्ड येथून बिट्टू भाऊ लष्करे यांना अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या खांद्यावर बसवून पुढील दिशेने निघाले तसेच नेवासा येथील गणपती चौक येथे श्री खोलेश्वर गणपती मंदिरात श्री गणेशाचे दर्शन घेऊन महागणपतीची आरती करण्यात आली तसेच हनुमान चालीसाचे पठण करून जय श्रीराम, जय शिवाजी ,जय भवानी ,धर्मवीर अण्णा भाऊ लष्करे अमर रहे अशा घोषणा देऊन नेवासा परिसर दुमदुमून गेले होते.