सोनई : अहमदनगर दक्षिणचे माजी खासदार तुकाराम गंगाधर गडाख(वय ६९) यांचेहृदयविकाराने निधन झाले.
त्यांचे राजकीय, आरोग्य,शैक्षणिक व आध्यात्मिक
कार्यात मोठे योगदान होते.त्यांच्या निधनाने नेवासा तालुका व नगर जिल्ह्यातशोककळा पसरली आहे.
गडाख यांचा जन्म एक नोव्हेंबर १९५३ रोजीनेवासा तालुक्यातील पानसवाडी येथे झाला. त्यांचे शिक्षण बीएससी ॲग्री झाले होते. १९८९ ते १९९४
मध्ये ते नेवासा- शेवगावचे अपक्ष आमदार तर
२००४ ते २००९ मध्ये अहमदनगर दक्षिणचे राष्ट्रवादी
पक्षाचे खासदार म्हणून निवडून गेले होते. त्यांचे
व्यक्तिमत्व वादळी म्हणून प्रसिद्ध होते. भाषणात
लोकांचे मतपरिवर्तन करण्याची क्षमता असलेले
नेते म्हणून त्यांची ओळख होती. नंतरच्या काळात
त्यांनी वारकरी संप्रदाय निवडुन भाविकांना अमूल्य
मार्गदर्शन केले. आदर्श विद्या मंदिर या शैक्षणिक
संस्थेची स्थापना करून सोनई, नेवासा, शेवगाव येथे शैक्षणिक संकूल उभे केले आहे. पानसवाडीच्या
सरपंच लक्ष्मीबाई गडाख यांचे ते पती, आदर्श
दिलदार नेता हरपला माजी खासदार तुकाराम गडाख हे नेवासा तालुक्यात भाऊ नावाने परिचित होते. धार्मिक,
कृषी, राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांनी
मोठे काम केले आहे. त्यांच्या अमोघ वक्तृत्वाची जनसामान्यांवर मोठी छाप होती. सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावून येणारा एक दिलदार नेता आज हरपला.
विद्यालयाचे सचिव रवी गडाख यांचे ते वडील व
पुणे येथील उद्योजक किसनराव गडाख यांचे ते भाऊ
होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, भाऊ,
पाच बहिणी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
काल दुपारी २ वाजता निवास स्थानाजवळ
मुलगा रवी गडाख यांनी त्यांना अग्नी दिला.
माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, खासदार
सदाशिवराव लोखंडे, शिवाजीराव कर्डिले, पांडुरंग
अभंग, विठ्ठलराव लंघे, भाऊसाहेब वाकचौरे, उदयन
गडाख, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, हर्षदाताई
काकडे यांनी त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी
मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.