नेवासा फाटा येथे सत्कार करताना राजूभाऊ उंदरे विजुभाऊ गाडे, अकोलकर पाटील, बादल भाऊ परदेशी ढवान पाटील.
वडाळा बहिरोबा .
नेवासा तालुक्यातील राजकीय दृष्टीने महत्त्वाचे समजला जाणारा, वडाळा बहिरोबा या गावाचे लोकनियुक्त सरपंच पदी, ललित पांडुरंग मोटे यांची निवड झाल्याने लोकनियुक्त सरपंच ललित मोटे यांचे तालुक्यात विविध ठिकाणी सत्कार करून शाल श्रीफळ देऊन अभिनंदन करण्यात आले, नेवासा, नेवासा फाटा ,हंडी निमगाव, सुरेश नगर, बाभूळ वेडा ,माळीचिंचोरा या विविध ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला, गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा करून पुढील वाटचालीस अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या ,त्यानंतर वडाळा बहिरोबा येथे संपूर्ण गावभर प्रत्येक मतदाराने आपले योग्य असे मतदान दिल्याबद्दल समस्त ग्रामस्थांच्या घरोघरी जाऊन ललित मोटे, निखिल मोटे, व त्यांच्या सर्व नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य व समर्थकांनी प्रत्येक मतदाराचे आभार मानले.