नाशिक शहरात चार घरफोड्या.

 नाशिक 
शहरासह उपनगरांमध्ये भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.वेगवेगळ्या चार ठिकाणी घरफोड्या करत अज्ञात चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी रात्रीच्या सुमारास गस्त वाढविण्याची मागणी सर्वसामान्य नाशिककरांकडून केली जात आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
कृष्णा बाळासाहेब सानप ( २९,रा. सुदर्शन अपार्टमेंट, हनुमानगर,अमृतधाम) यांच्या बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. मोबाइल,हेडफोन, हेल्मेटसह १३ हजारांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. तर राजेश प्रभाकर कामळे (४९, रा.यमुनानगर, त्रिमूर्ती चौक, सिडको)यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडूनअज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला.बेडरूममधील लोखंडी व लाकडी कपाटातील सोन्याची चेन, कानातले,चांदीचे कॉइन तसेच ३० हजारांची रोकडघेऊन चोरट्यांनी पोबारा केला.कुणिका राजेश पाटील (३९, रा.विनय अपार्टमेंट, थत्तेनगर, कॉलेजरोड)यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून संजय प्रभाकर गणोरकर (६०, रा. गायकवाडनगर,मुंबई नाका) यांच्यासह इतर अनोळखी
इसमाने अनधिकृतपणे आत प्रवेशकेला.गणोरकर व त्यांच्या साथीदारांनी दागिने, फ्रीज, वॉशिंग मशीन, फर्निचर,बेड, कपडे, किचन ट्रॉली असा १०लाखांचा ऐवज चोरून नेला. तर अवैस रऊफ खान (२६, रा. मौलानाआझाद रोड, भगूर) यांचे देवळाली कॅम्प बसस्थानकाजवळ मोबाइलचे दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कलप तोडन आत प्रवेश करत
अॅक्सेसराज लाबावल्या.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.