मांगुर जातीचा माशाचा आयशर टेम्पो जप्त स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.

अहमदनगर.
स्थानिक गुन्हे शाखेतील पथक  पोनि / श्री. अनिल
कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सोलापुरकडुन- अहमदनगरच्या दिशेने एक तपकिरी
रंगाचे आयशर कंपनीचा निळे रंगाची ताडपत्री बांधलेला टेम्पोमध्ये बंदी असलेला मांगुर जातीचा मासा विक्री
करीता घेवुन जात आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/ श्री. अनिल कटके यांनी सदर माहिती
पथकास कळवुन नगर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना मदतीस घेवून खात्री करुन
कारवाई करणे बाबत आदेश दिले.
नमुद आदेशान्वये पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्थानिक पोलीस स्टेशन व पंचांचे
मदतीने नगर सोलापुर रोडने जावुन रुईछत्तीशी शिवारातील हॉटेल सुयोग समोर सापळा लावुन थांबलेले
असतांना बातमीतील नमुद तपकिरी रंगाचा आयशर टेम्पो येताना दिसला पथकाची खात्री होताच टेम्पो
चालकास हात दाखवुन थांबण्याचा इशारा करताच त्याने ताब्यातील आयशर टेम्पो रस्त्याचे कडेला उभा
केला. त्यावेळी टेम्पोमध्ये दोन इसम बसलेले दिसले. त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव
विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) दिपनकर परेश देवनाथ, वय ३० व २) आल्लुदिन जायनाल रपतान
वय ३६, दोन्ही रा. बिथारी नॉर्थ २४, परगनस, राज्य पश्चिम बंगाल असे असल्याचे सांगितले. त्यांना
टेम्पोमध्ये काय आहे अशी विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीस समाधानकारक उत्तरे न देता उडवा
उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यांना अधिक विश्वासात घेवुन बारकाईने विचारपुस करता त्यांनी
टेम्पोमध्ये मांगुर जातीचा जिवंत मासा असुन तो सोलापुर येथील शेततळ्यातुन काढुन टेम्पोमध्ये भरुनमध्यप्रदेश येथील इंदौर येथे घेवुन जात असले बाबत माहिती दिल्याने दोन्ही संशयीतांना ताब्यात घेतले व मा.
सहाय्यक मत्सविकास अधिकारी, अहमदनगर यांना संपर्क करुन ताब्यातील माश्याबाबत अभिप्राय देणे
विषयी कळविले. त्यांनी लागलीच घटना ठिकाणी येवुन टेम्पोमधील माश्याची पाहणी करुन सदर मासा हा
मांगुर जातीचा असुन नमुद मांगुन जातीचे माश्यापासुन भारतीय माशांचे प्रजातीला व पर्यावरणाला धोका
असुन मत्सपालन, विक्री व वाहतुकीस बंदी आहे असा अभिप्राय दिला व एक मांगुर जातीचा मासा पुढील
तपासणी करीता सॅम्पल म्हणुन काढुन घेतल्याने दोन्ही इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे ताव्यातुन
८,२५,००० /- रुपये किंमतीचा ५,५०० किलो वजनाचा मांगुर जातीचा मासा व २०,००,०००/- रुपये
किंमतीचा आयशर कंपनीचा टेम्पो असा एकुण २८,२५,०००/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताव्यात घेवुन
दोन्ही आरोपी विरुध्द पोना/१३७२ संतोष शंकर लोढे, ने. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे फिर्यादी
वरुन नगर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. ८८५/२०२२ भादविक १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात
आलेला आहे. पुढील कायदेशिर कारवाई नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई  पोनि/ श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि / दिनकर मुंडे,
सफौ/मनोहर शेजवळ, पोहेकॉ/ दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, देवेंद्र
शेलार, पोना/शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, पोकॉ/ रोहित मिसाळ, मपोना / भाग्यश्री भिटे, सारीका दरेकर व
चापोहेकॉ/उमाकांत गावडे . पोलीस. अधीक्षक राकेश ओला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. अजित पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी,
नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व
अंमलदार यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.