वडाळा
प्रतिनिधी .संदीप वारकड
वडाळा गावात नवं निर्वाचित लोकनियुक्त
सरपंच यांचे सत्कार सोहळे संपता संपेना.....
नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील लोकनियुक्त सरपंच श्री. ललितदादा मोटे पाटील यांचा सत्कार सोहळे संपता संपेना. श्री लालितदादा मोटे पा. हे सार्वत्रिक निवडणुका 2022 मध्ये वडाळा बहीरोबा येथे भरघोस मतांनी निवडून आले. त्याच बरोबर त्यांच्या पॅनल चे नऊ उमेदवारही भरघोस मतांनी विजयी झाले. त्यामुळे यांचे वडाळा ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्तापित झाले. एकीकडे ललित दादा ची गोरगरीब जनता सत्कार सोहळे करत असताना , दुसरीकडे तालुक्यातील वडाळा पंचकृशितील शेजारील गावातील लोक , लोकप्रतिनिधी , व्यावसायिक , मित्र परिवार याचे देखील सरपंच ललित दादा यांचा सत्कार करण्यासाठी चडाओढ दिसून येत आहे.असाच एक भव्य सत्कार सोहळा हा फ्रेंडस ग्रुपकडून आयोजित करण्यात आला होता . या सत्कार सोहळ्यात सरपंच श्री. ललित दादा मोटे पाटील सर्व उमेदवार यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ तसेच शाली प्रदान करून भव्य सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळा पार पडल्यानंतर स्नेहभोजनचाही कार्यक्रम मोठ्या उत्सोवात पार पडला.या कार्यक्रमाप्रसंगी फ्रेंड्स ग्रुप अध्यक्ष श्री. आनंद मोटे , उपाधक्ष श्री . गणेश गडाख तसेच फ्रेंड्स ग्रुप चे सर्व सभासद , तसेच मुरलीधर मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष श्री. संग्राम शेठ मोटे पाटील , श्री किरण तवले पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.