मुरबाडमध्ये आठ ग्रामपंचायतींवर भाजपचा, सहांवर शिंदे गटाचा तर दोन वर शिवसेना ठाकरे गटाचा दावा
------------
तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची मतमोजणी आज पर पडली.एकूण अकरा ग्रामपंचायतींमध्ये 112 उमेदवार रिंगणात होते.अकरा ग्रामपंचायतींपैकी आठ ग्रामपंचायतींवर भाजपाने सहा ग्रामपंचायतींवर शिंदे गटाने तर दोन ग्रामपंचायतींवर शिवसेनेच्या ठाकरे गटाने दावा केला आहे
मुरबाड तालुक्यात असोळे, कान्होळ, किशोर, खोपीवली, तोंडली,माळ, साकुर्ली, सासणे,मोहघर, डोंगरन्हावे, भादाणे,आंबेळे (बु),व तळेगाव अशा अकरा ग्रामपंचायतींची मतमोजणी आज पार पडली, तर असोळे, किशोर, वैशाखरे ह्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.तालुक्यातील तोंडली, साकुर्ली, सासणे, मोहघर,डोंगरन्हावे तळेगाव, वैशाखरे, व कान्होळ या ग्रामपंचायतींवर भाजपाने दावा केला आहे.तर असोळे, खोपिवली, माळ, आंबेळे,किशोर, भादाणे या ग्रामपंचायतींवर शिवसेना शिंदे गटाने दावा केला आहे.तर यातीलच किशोर व भादाणे या ग्रामपंचायतींवर शिवसेनेच्या ठाकरे गटाने दावा केला आहे.