नेवासा .नेवाशात भारत मुक्ति मोर्चा ,आणि बहुजन समाजातील ,राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षासहीत विविध संघटनांच्या वतिने महाराष्ट्र बंदला समर्थन दिले ,समर्थन
चे निवेदन नेवासा पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक ,विजय करे साहेब यांना देताना ,भारत मुक्ति मोर्चा चे
गणपतराव मोरे ,आणि अशोक माळी,आर पी आय चे नितिन भालेराव, कॉग्रेसचे संभाजी माळवदे, शोभा पातारे, नितिन जाधव, राजू सय्यद ,भिमा कांबळे, संजय
मोटे ,आदी मान्यवर उपस्थित होते
महाराष्ट्रांत सताधारी पक्षांच्या सध्या कार्यकत्याकडुन महापुरुषांचे अवमान होत आहे. तसेच शालेय शिक्षण व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतीराव ,फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भीक मागणे ,या शब्दाने अवमान केला,त्याचा निषेध म्हणून आंबेडकर चळवळीतील गरबडे ,या कार्यकत्याने चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाई फेकली. व त्यांच्या वर शाई फेकण्याचा जो गुन्हा आहे तो दाखल व्हायला हवा होता. परंतु पोलिसांनी त्यांच्यावर ३०७ सारखे असे मर्डरचे गुन्हे दाखल केलेत ज्या मिडीयाने ते फोटो व्हारल केले. त्या पत्रकारांवर देखील गुन्हा दाखल केला. आणी १४ पोलिसांवर निलंबनाची कार्यवाही करण्यांत आली. हे सर्व सतेचा दुरुपयोग करून करण्यात आले आहे.
तरी वरील सर्व गुन्हे मागे घेण्यांत यावेत. व शाई फेकण्याचा जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात यावा. व पोलिसांवरील निलंबनाची कार्यवाही देखील मागे घेण्यांत
यावी. यासाठी सर्व पक्षीय कार्यकर्ते आजच्या बंदला नेवासा तालुक्यातुन समर्थन देण्याचे निवेदन नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना दिले.