कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या शास्त्रीय सल्लगार समितीची बैठक संपन्न.

कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या शास्त्रीय सल्लगार समितीची बैठक संपन्न
दहिगाव- (प्रतिनिधी):- श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या ८ वी शास्त्रीय सल्लगार समितीची  बैठक  दहिगाव-ने येथे दिनांक २५ नोव्हेंबर रोजी संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ.नरेंद्र घुले पाटील उपस्थित होते.
या सल्लागार समितीच्या बैठकीस समितीचे सदस्य जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, आत्मा अहमदनगर उपप्रकल्प संचालक श्री. राजाराम गायकवाड, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी विद्या विभाग प्रमुख डॉ.आनंद सोळंकी, कृषि विस्तार शिक्षण संचालनालयचे डॉ.गोकुळ वामन, कृषि माहिती व तंत्रज्ञान केंद्राचे व्यवस्थापक डॉ.दत्तात्रय पाचारणे, डॉ.गणेश शेळके, विभागीय ऊस संशोधन केंद्र, प्रवरानगरचे शास्त्रज्ञ डॉ.योगेश थोरात, आकाशवाणी अहमदनगर चे कार्यक्रम अधिकारी भैय्यालाल टेकाम, शशिकांत जाधव, इफको अधिकारी तुषार गोरड, नॅशनल सीड कॉर्पोरेशनचे व्यवस्थापक गणेश निकम, मृदा सर्वेक्षण व मृद चाचणी अहमदनगर चे अधिकारी आर. आर. भोसले, मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे सहसचिव रविंद्र मोटे, संस्थेचे संचालक काकासाहेब शिंदे, अशोक मिसाळ तसेच शेतकरी प्रतिनिधी हुकूम बाबा नवले, आप्पासाहेब फटांगरे, रेवन्नाथ उकिर्डे, रतन मगर, संजय तनपुरे, सुदर्शन काळे, शशिकांत शिंदे, पुष्पा अर्जुन नवले आदी उपस्थित होते.

कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. शामसुंदर कौशिक यांनी सन २०२२ मध्ये केंद्रामार्फत राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती या सभेत सादर केली.  दहिगाव-ने कृषी विज्ञान केंद्राने पिक संरक्षण विषय विशेषज्ञ माणिक लाखे यांनी संपादित केलेल्या "शास्त्रीय मधुमक्षिका पालन" प्रशिक्षण पुस्तिकेचे प्रकाशन व कृषि विज्ञान केंद्र एका दृष्टिक्षेपात या माहिती पत्रकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  बैठीकीनंतर शास्त्रीय सल्लागार समितीच्या सदस्यांना प्रकाश हिंगे, नंदकिशोर दहातोंडे यांनी केव्हीके प्रक्षेत्रावरील चालू असलेल्या उपक्रमांना तसेच विविध प्रकल्पांना भेटी देऊन माहिती दिली.

सदर कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ नारायण निबे, इंजि.राहुल पाटील, प्रकाश बहिरट, वैभव नगरकर प्रविण देशमुख, अनिल देशमुख, दत्तात्रय वंजारी, संजय थोटे, गणेश घुले व संजय कुसळकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन बडधे यांनी केले. प्रकाश हिंगे यांनी आभार  मानले.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.