नगर जामखेड रोडवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई .

नगर जामखेड रोडवर पाच हजार किलो गोमांस जप्त
वाहनासह एकूण १४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त दोघे ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहमदनगर 
स्थानिक
गुन्हे शाखेच्या पथकाने महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जातीचे तब्बल १४ लाख ५०हजार रूपये किंमतीचे पाच हजार किलो गोमांस व आयशर टेम्पोनगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथुन जप्त केला आहे.
याप्रकरणी मोहसीनमेहमुदखान(रा.कोठला,अहमदनगर)सलीम कलीम कुरेशी(रा. कुरेशी हॉटेल जवळ,अहमदनगर मुळ रा. बहिराईच,बरेली, जि. लखनऊ, उत्तरप्रदेश)या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याबाब अधिक माहितीअशी की, स्थानिक गुन्ह शाखेचे पोलिस निरीक्षक
अनिल कटके यांना गुप्त बातमीदाराने माहिती दिली
की, तौफिक कुरेशी हा त्याच्या हस्तकामार्फत अहमदनगरकडुन जामखेडच्या दिशेने एका लाल
रंगाच्या आयशर टेम्पोमधुन गोवंशीय जातीची जनावरांची
कत्तल करुन गोमासांची विक्री करण्याच्या उद्देशाने
आयशर टेम्पोमधुन वाहतूक करत असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोनि. कटके यांनी लागलीच स्थानिक
गुन्हे शाखेतील स्थानिक गुन्हे शाखेतील सफी मनोहर
शेजवळ, पोहेकॉ.संदीप घोडके,दिनेश मोरे, पोना.शंकर चौधरी,रवि सोनटक्के, संतोष लोढे,पोकॉ. सागर ससाणे, रोहित येमुल व चापोहेकॉ. उमाकांत गावडे यांना नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले.या पथकातील पोलीसअधिकारी व अंमलदार यांनी नगर तालुका पोलीस स्टेशनचेअंमलदार यांचे मदतीने नगर जामखेड रोडवरील चिचोंडी पाटील येथे सापळा लावुन थांबलेले असतांना बातमीतील
नमुद लाल रंगाचा टेम्पो येताना दिसला. त्यांनी टेम्पो चालकास बॅटरीने लाईट दाखवुन
थांबण्याचा इशारा करताच त्याने सदर टेम्पो चालकाने टेम्पो रस्त्याचे कडेला उभा केला.लागलीच पथकातील अंमलदारयांनी टेम्पो चालकास व त्याचे
शेजारी बसलेल्या इसमास ताब्यात घेवून त्यांचे नाव गांव
विचारले असता त्याने मोहसीन मेहमुद खान (रा.कोठला,
अहमदनगर) सलीम कुरेशी (कुरेशी हॉटेल जवळ,अहमदनगर मुळ रा. बहिराईच बरेली, जि. लखनऊ, राज्य उत्तरप्रदेश) असे असल्याचे सांगितले. आयशर टेम्पोची झडती घेतली असता टेम्पोमध्येमहाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशी जातीची जनावरांचेगोमास व अर्धवट कापलेली गोवंशीय जनावरे दिसली.त्याचेकडे गोवंश कत्तल व वाहतुकी बाबत विचारपुस
करता त्याने सदर गाडीमध्ये भरलेले गोमस हे तौफिक
कुरेशी व अब्दुल बारी कुरेशी(दोन्ही रा. अहमदनगर) यांच्या मालकीचे आहे व गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करुन टेम्पो मधुन गोमास विक्री करीता घेवुन
चाललो असल्याची कबुली दिली. या दोघांकडून ५०००
किलो गोमास व अर्धवट कापलेली गोवंशीय जनावरे व
वाहतुकीसाठी वापरलेला लाल रंगाचा आयशर टेम्पो असा एकुण १४ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत पोना रविकिरण बाबुराव सोनटक्केयांच्या फिर्यादीवरुन नगर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन, पुढील कारवाई नगर तालुका पोलिस
करत आहेत.सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीसअधिकारी नगर ग्रामीण अजीत
पाटील यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे
शाखेचे पोलीस अधिकारी वअंमलदार यांनी केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.