ठाण्यात आठ कोटींच्या बनावट नोटा जप्त
ठाणे दि. १२ - ठाणे पोलिसांनी कासारवडवली
पोलीस ठाण्याच्या हदीत कारवाई करून दोन
इसमांकडून सुमारे आठ कोटी रुपये किमतीच्या दोन
हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. गायमुख
भागात काही इसम बनावट नोटा घेऊन येणार आहेत
अशी माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती.
त्यानुसार त्यांनी तेथे सापळा रचला होता. त्यावेळी
हे इसम नोटांसह जाळ्यात सापडले. त्यांनी या नोटा
कोठून मिळवल्या याची आता माहिती घेतली जात
असून बनावट नोटांचे एक मोठे रॅकेटच यानिमीत्ताने
उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राम
हरी शर्मा आणि राजेंद्र राऊत अशी अटक करण्यात
आलेल्या दोघांची नावे आहेत. ते पालघर आणि
विरार परिसरात राहण्यास आहेत. त्यांनी आपण
मदन चौहान नावाच्या एका इसमाकडून या नोटा
मिळवल्याचे पोलिसांना सांगितले आहे. या लोकांनी
पालघर येथील एका कंपनीच्या कार्यालयांत या नोटा
छापल्याची माहिती मिळत आहे.