नेवासा फाटा येथील जमीन ताबा प्रकरणी गुन्हा दाखल.

नेवासा,
 जुन्या मोजणी नकाशाच्या आधारे मूळ नकाशामध्ये अधिकाऱ्यांना हाताशी धरून मूळ कागदपत्रात फेरबदल व नवीन बनावट नकाशा तयार केला. 'त्या' नकाशाच्या सहाय्याने नगररचना कार्यालय, नगर येथील अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस बनावट कागदपत्राच्याआधारे जमीन हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात जणांवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यात नेवासा पंचायत समितीचे माजी उपसभापती तुकाराम काळे दाखल करण्यात आला आहे.मुकिंदपूर (नेवासा फाटा) येथे
अंबादास घुले यांच्या मालकीची जमीन जायकवाडी धरणामध्ये बाधित झाल्यामुळे त्यांना बाधितप्रकल्पग्रस्त म्हणून सन १९८७ मध्ये त्यांच्या आजोबांच्या नावे मुकिंदपूर येथील गट नंबर ७३मध्ये ८१ आर जमीन पुनर्वसन सदराखाली मिळालेली आहे.या जमिनीवर आजतागायत घुले कुटुंबीयांचा संयुक्त ताबा आहे.दरम्यान, या जमिनीत काही इसम घुले यांच्या मालकी हक्काच्या
क्षेत्रात जेसीबीच्या सहाय्याने काही गुंडांचाजमाव घेऊन घटनास्थळी आले. गट नंबर ७३ पैकी काही क्षेत्रात साफसफाई करून बोगस कागदपत्रांच्या सहाय्याने कब्जा करण्याचा प्रयत्न करत असल्याची नेवासा माहिती मिळाल्याने हा प्रकार घुले यांच्या लक्षात आला.
पोलीस ठाण्यात माजी उपसभापती तुकाराम काळे यांच्यासह राजू जहागिरदार, प्रविण साळवे, मुज्जफर
शेख, शिवाजी लक्ष्मण पाठक,संतोष शेषमल फिरोदिया, अमित संतोष फिरोदिया या सात जणांसह
अन्य तीन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. ज्ञानेश्वर वसंत घुले (रा.लोखंडे गल्ली, नेवासा) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.