ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात नेवासा तालुक्यातील गोधेगाव, बहिरवाडी, धामोरी,प्रवरासंगम, सुरेगाव गंगा, भालगाव,खालसा, बोरगाव, जळके खु,जळके बु,वरखेड, शिरसगाव, पाचेगाव, घोगरगाव,मंगळापुर, खेडलेकाजळी या गावासह नेवासा तालुक्यातील आठही महसूल
मंडोर पाऊस होऊन पिके पाण्याखाली गेली आहेत कपाशी, तूर, सोयबीन,कांदा,बाजरी,भुईमूग, आदी पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे जागोजागी जमीन शेवाळली आहे तसेच अनेक ठिकाणी मातीही वाहून गेली आहे.२४ तासात ६५ मिली मीटर पेक्षा
जास्त पाऊस झाला तरच अतिवृष्टी हा नियम वस्तुनिष्ठ नाही त्यासह पीक विमा कंपनी यांच्या कडून नुकसान झालेल्या पिकांचे फोटो अपलोड करणे, टोल फ्री नंबर वर तक्रार करणे यासह इतर जाचक अटी या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अडचणीच्याआहेत यावर तातडीने कार्यवाही करून नेवासा तालुक्यातील गावा गावांत शेती
पिकांचे पंचनामे तातडीने करण्यात यावेत तसेच महसूल व कृषी विभाग यांनी गाव गावात पिकांची पाहणी करावी व पंचनामे करतांना त्यात कुठलाही दुजाभाव करू
नये शेतकऱ्यांना मदत मिळावी या पद्धतीने पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल पीक विमा कंपन्यांनाही पाठवावा व शासनाच्या मदतीबरोबरच पीक विमा
कंपन्यांकडूनही शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी व शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी आ. शंकरराव गडाख यांनी निवेदनाद्वारे तहसिलदार रुपेशकुमार सुराणानेवासा यांचेकडे केली आहे. या प्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी श्रीरामपूर विलास नलगे, तालुका कृषी अधिकारीदत्तात्रय डमाळे, बाळासाहेब शिंदे, दिगंबरनांदे, दत्तात्रय तुवर, काकासाहेब गायकेआदी उपस्थित होते.