मुंबई : शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात गोठवल्यानंतर शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्षासाठी आणि चिन्हासाठी तीन पर्याय सादर केले आहेत. ते आयोगाने स्वीकारले असल्याची माहिती खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
यांनी जनतेशी समाजमाध्यमांद्वारे संवाद साधताना दिली.
शिवसेना बाळासाहेब ठाकरे,शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव
बाळासाहेब ठाकरे अशी ३ नावे नव्या पक्षासाठी, तर त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल अशा चिन्हाचा
पर्याय शिवसेनेने आयोगाकडे सादर केला आहे. यापैकी एक नाव आणि एक चिन्ह शिवसेनेला मिळू शकते.
याबाबतचा निर्णय सोमवार, १०ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोग घेण्याची शक्यता आहे.शिवसेना आणि बंडखोरांकडून पुरेशी कागदपत्रे सादर करण्यात
आली नसल्याची भूमिका घेत आयोगाने शनिवारी शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण तात्पुरत्या स्वरूपात गोठवले आहे. दोन्ही गटांना पक्षाच्या नव्या नावासाठी
आणि चिन्हांसाठी तीन-तीन पर्याय सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.शिवसेनेने त्यानुसार शनिवारीच नव्या
पक्षासाठी तीन संभाव्य नावे आणि तीन चिन्हांचेही पर्याय सादर केले.नवे नाव व चिन्ह देताना
पक्षाच्या संभाव्य नावासाठी ठाकरे कुटुंबीयांतील तीन पिढ्यांची नावे वापरण्याचा निर्णय उद्धव
ठाकरे यांनी घेतला आहे. त्याचा पसंतीक्रम देतानाही बारकाईने विचार केला गेला आहे. पसंती क्रमानुसार निवडणूक आयोगाला तीन पर्याय देण्यात आले आहेत.
शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाला पहिली पसंती दिली आहे.शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार
ठाकरे' आणि 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' अशी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा पसंतीक्रम दिला
आहे. दुसरीकडे पक्षाच्या चिन्हासाठी त्रिशूळ या चिन्हाला पहिली पसंती दिली आहे. उगवता सूर्य आणि
मशाल यांना अनुक्रमे दुसरी आणि तिसरी पसंती दिली आहे. त्यावर सोमवारी दुपारी नवी दिल्लीत सुनावणी होणार आहे. त्यावेळी शिवसेनेला नवे नाव आणि चिन्ह
देण्याबाबत निर्णय घेतला जाणारआहे. दुसरीकडे बंडखोरांनाही पक्षासाठी व चिन्हासाठी तीन-तीन
पर्याय सादर करण्यास सांगितले गेले आहे. त्यांच्याकडून सोमवारी सकाळी हे पर्याय आयोगाकडे सादर
केले जाणार आहेत. बंडखोरांचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री आपल्या गटातील
आमदार-खासदार व नेत्यांची बैठक बोलावली असून, त्यात चर्चा करून पक्षाचे नवे नाव व चिन्ह ठरवण्यात येणार असल्याची माहिती मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर
यांनी दिली आहे.