नेवासा-
खडका रोडवर अक्षय कला क्रीडा ग्रामीण सेवाभावी
संस्था संचालित असलेल्या शरणपूर वृद्धाश्रमात वृद्धांमध्ये अध्यात्मात गोडी निर्माण व्हावी म्हणून गुरुवर्य भास्करगिरीजी बाबांच्या प्रेरणेने ग्रंथराज ज्ञानेश्वरी व हरिपाठ भेट देण्यात आले.नेवासा येथील इंजिनियर सुनील वाघ यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील वाघ होते. वृद्धाश्रमाचे रावसाहेब मगर, सचिव सुरेखा मगर, सुधीर चव्हाण, व्यवस्थापक संतोष मगर यावेळी उपस्थित
होते. जीवनात चांगले सत्कर्म घडण्यासाठी दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने शिधारूपाने वआर्थिक पाठबळ देऊन हातभार लावावा असे आवाहन यावेळी उपस्थितांनी केले. वृद्धाश्रम व्यवस्थापक संतोष मगर यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी वृद्धांना पेढे वाटून या कार्यक्रमाची सांगता करण्यातआली.