अहमदनगर.
लम्पी स्कीन आजाराने राज्यभर थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर या आजाराला आळा घालण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यात जनावरांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नुकतेच आदेश जारी केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी
अहमदनगर जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. लम्पी स्किन आजारास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहे.
प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे यास मनाई करण्यात आली आहे.
जनावरे लम्पी स्कीनने बाधित
जिल्ह्यात एकूण १६ लाख २१ हजार गायी व म्हशींची संख्या आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २७३ जनावरे लम्पी स्कीन आजाराने बाधित झाली आहे. जिल्ह्यात लम्पी आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ६७ हजार ६४ जनावरांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिले आहे.
पिंपरी चिंचवड.
गणपती विसर्जन मिरवणूक पाहायला गेले आणि तिजोरी साफ केली दरवाजाला कुलूप लावून रात्री आठच्या सुमारास कुटुंबीय गणपती गेले होते इथून परतल्यानंतर दरवाजाचे कुलूप प्विस्कटलेले होते पत्राच्या पेटीतील १३ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या सोन्याचे दागिने व पन्नास हजारांची रोकड चोरीला गेले आहे हा प्रकार पिंपरीतील साई चौक येथे घडला आहे पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत .