राहुरी.
नेवासा तालुक्यातील एका तरुणाला मंत्रालयात नोकरीच लावून देतो असं अमिष दाखवून पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली याप्रकरणी राहुरी पोलिसांनी सदर भामट्याला सापळा रचून पकडले मात्र त्याचे साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले या प्रकरणी नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील महेश बाळकृष्ण वागडकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी दत्तात्रय अरुण क्षीरसागर वय 31 राहणार दत्तनगर मालेगाव आकाश विष्णू शिंदे राहणार संगमनेर तसेच त्याचे इतर साथीदार वर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .