अहमदनगर.
सावेडी उपनगरातील पारिजात चौकात सुरू असलेल्या हुक्का पार्लर वर छापा टाकत 2500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली आहे या प्रकरणी अनंत सर्जेराव मिसाळ वय वर्ष 22 रा.सुडके मळा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पारिजात चौकात हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना मिळाली होती माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाई करण्याच्या सूचना निरीक्षक गडकरी यांनी दिल्या होत्या त्यानुसार पथकाने कारवाई करत दोन हजार रुपयांचे हुक्का पिण्यासाठी शंभर रुपयांचे निळ्या रंगाचे पाईप आणि चारशे रुपयांचे फ्लेवर असा 2500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या सूचनेप्रमाणे उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस नाईक वसीम पठाण ,अहमद इनामदार पोलीस कॉन्स्टेबल गिरी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.