राहुरी.
मंत्रालयात नोकरी मिळवून देतो असं सांगून सुशिक्षित बेरोजगार तरुणाला फसवणाऱ्या भामट्याला राहुरी पोलिसांनी अटक केल्यानंतर यामध्ये मोठे रॅकेट असल्याचे तपासात निष्पन्न होत असून एका गाजलेल्या चित्रपटातील कलाकाराचा सहभाग असल्याने राहुरीचे पोलीस लवकरच प्रसिद्ध चित्रपट सैराट मधील प्रिस सुरज पवारच्या मुस्क्या आवळणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की महेश बाळकृष्ण वाघडकर राहणार भेंडा तालुका. नेवासा जिल्हा अहमदनगर यला दिनांक 3 सप्टेंबर रोजी एक फोन आला समोरची व्यक्ती म्हणाली की मी श्रीरंग कुलकर्णी सामाजिक न्याय विभाग मंत्रालयातून बोलत आहे आमच्या विभागात कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या सहाय्यक कक्षा अधिकारी म्हणून जागा खाली असून त्या भरायचे आहेत तेथे तुम्ही इच्छुक असाल तर तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील काम होण्यापूर्वी दोन लाख आणि जेव्हा तुमच्या हातात ऑर्डर तयार होईल तेव्हा तीन लाख रुपये द्या त्यामुळे रोजगाराचा प्रश्न असल्याने वागडकर यांनी पैसे देण्यास सहमती दर्शवली तेव्हा राहुरी विद्यापीठ येथे बोलविण्यात आले तेथे वागडकर गेले असता कुलकर्णी हा तेथे आला तेव्हा तो राहुरी विद्यापीठाच्या व्हीआयपी गेस्ट येथे थांबला होता त्याच्याकडे काही बनावट कार्ड असल्याची माहिती समोर आली आहे मात्र जेव्हा आरोपी आणि फिर्यादी तेथे भेटले तेव्हा आरोपीच्या काही गोष्टींचा वागडकर यांना संशयाला श्रीरंग कुलकर्णी यांना आपली फसवणूक केली आहे असं लक्षात आलं व रक्कम देण्याचा टाळलं व आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली राहुरी पोलिसांनी चौकशी केली असता लक्षात आलं की श्रीरंग कुलकर्णी हा कोणी व्यक्ती मंत्रालयात नसून तो व्यक्ती म्हणजे दत्तात्रय अरुण क्षीरसागर राहणार दत्तनगर मालेगाव बस स्टॉप नाशिक हा आहे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहे
ही सर्व घटना लक्षात आल्यानंतर संबंधित ऑर्डर बनविणे ओळखपत्र बनविण्यासाठी शिक्के आणि अन्य कागदपत्रे आवश्यक असतात म्हणून पोलिसांनी पुढे तपास सुरू केला त्यात ओंकार नंदकुमार तरटे राहणार तालुका संगमनेर या तरुणाच्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला तो रबरी शिक्के तयार करण्याचे काम करतो पोलिसांनी अटक केली आहे त्यानंतर त्याच्याकडून मोठी माहिती उघड झाली आहे सैराट चित्रपटात ज्यानं आर्चीच्या भाऊ म्हणजे प्रिन्स म्हणून काम केलं तो प्रिन्स देखील संगमनेरात आला होता त्याने बनावट शिक्के तयार करणाऱ्याला भेटून आम्हाला कामासाठी हे शिक्के लागतात असं सांगून नागराज मंजुळे यांच्याशी बोलणे करून दिल्याचा आरोपींना सांगितलाय आरोपींनी भारताच्या राजमुद्रा बनावट करून त्याचा गैरवापर केला म्हणजे हा एक प्रकारे देशद्रोहासारखा गुन्हा मानला जातो त्यामुळे राहुरी पोलीस लवकरच सैराट चा प्रिन्स सेलिब्रिटी पवार यांच्या याच्या मुस्क्या आवळून गजाआड करणार आहेत पुढील तपास पोलीस करीत आहेत.