संभाजीनगर.
संभाजीनगर शहर हद्दीतील सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात या कर्मचाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संतोष वाघ असे या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून तो संभाजीनगर ग्रामीण पोलिसात सोयगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहे संतोष वाघ यांना आपल्या मित्र रामचंद्र याच्या सहकार्याने व्यापाऱ्याला केंब्रिज चौकात अडवून पोलीस असल्याचे सांगत चौकशी करण्याच्या बहाण्याने अडवून तब्बल 24 तोळे सोने आणि आठ लाख 40 हजार रुपये लुटले आहे लुटलेल्या व्यापाऱ्याचे नाव अशोक विसपुते असे आह त्यानंतर व्यापाऱ्याने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी संतोष वाघ विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पुढील चौकशी पोलीस करत आहे.