श्रीरामपूर.
तालुक्यातील भोकर येथील दीपक बर्डे प्रकरणात आरोपींनी पोलिसांना दिलेल्या कबूली जबाबमुळे दीपक याचे अपहरण करून त्याची निर्गुणपणे हत्यानंतर त्याचा मृतदेह गोदावरी पात्रात टाकल्याचे समजतात . प्रशासनाने युद्ध पातळीवर मृतदेहाची शोध मोहीम सुरू असताना माजी राज्यमंत्री तथा आदिवासी नेते शिवाजी ढवळे यांचे नेतृत्वाखाली भोकर फाटा या ठिकाणी भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळेस शिवाजीराव ढवळे म्हणाले की सदरचा खटला जलद गती न्यायालयात चालवावा. मुलगा मुलगी कोणत्याही समाजाची असो परंतु ते वयात असल्यास त्यांना लग्न करायचा अधिकार कायद्यात आहे. तरी श्रीरामपूर तालुक्यात जातीय दरी निर्माण झाली असून अजूनही जात नष्ट झालेली नाही याचे उदाहरण असल्याचं आदिवासी नेते शिवाजी ढवळे यांनी म्हटलं