पिंपरी चिंचवड
रोजगार मेळावा महापालिकेच्या वतीने शहरातील युवक आणि युवतींसाठी मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे औद्योगिक नगरी तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील औद्योगिक वसाहतीत अनेक छोट्या मोठ्या कंपन्या आहेत या कंपनीला लागणारे मनुष्य व पुरवण्यासाठी तसेच शहरातील युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शुक्रवारी 16 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत भव्य रोजगार आयोजन करण्यात आले आहे या रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रातील नामवंत कंपन्या मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत दहावी बारावी आयटीआय तसेच विविध विद्या शाखांमधून पदवीधर झालेले इच्छुक उमेदवारांना जास्तीत जास्त संख्येने महापालिकेचे मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उपस्थित राहून रोजगारांच्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी केले आहे .