श्रीरामपूर मध्ये नितेश राणे यांच्या उपस्थितीत मोर्चा.

श्रीरामपूर.
नवाब मलिक आता मंत्री नाहीत मुश्रीफ नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नाहीत आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत हे पोलीस प्रशासनाने ध्यानात ठेवाव राज्यात हिंदुत्ववादी सरकार सरकार सत्तेत आहे हिंदूंकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर तो नीट घरी जाणार नाही हे लक्षात ठेवा आम्ही शांततेत आहोत तर शांततेत राहू द्या आम्हाला शस्त्र हातात घ्यायला लावू नका असा इशारा आमदार नितेश राणे यांनी श्रीरामपूर येथील हिंदू जन आक्रोश मोर्चा प्रसंगी दिला आहे श्रीरामपुरात आज दुपारी आमदार नितेश राणे आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपुरातील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता 
आदिवासी तरुण दीपक बर्डे यांचे अपहरण केले, आणि पोलिसांना आरोपींना अटक करून पाच-सहा दिवस झाले आजपर्यंत दीपक सापडलेला नाही आहे पोलीस तपस यंत्रणेच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी बोलताना आमदार राणे म्हणाले ज्या अधिकाऱ्याकडे तपस आहे तो अधिकारी रजेवर जातो  यापुढे गरिबाला न्याय मिळणार नसेल तर आता हिंदू गप्प बसणार नाही तर तांडव करतील या बर्डे प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे तीन-चार दिवस झाले तरी आरोपींकडून तुम्हाला माहिती मिळत नाही कसली चौकशी करतात तर थर्ड डिग्री द्या दोन मिनिटात आरोपी पटापटा बोलतील आमच्या घरात मुख्यमंत्री पद राहिले आहेत त्यामुळे पोलिसांनी उत्तर द्यावे असे सांगत आमदार राणे म्हणाले  तालुक्यातील भोकर येथील आदिवासी समाजातील दीपक बर्डे हा युवक मुस्लिम युवतीशी लग्न केल्यानंतर आज तागायत बेपत्ता आहे याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली या सर्व प्रकरणाची दखल भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी घेतली हे हिंदुत्ववादी सरकार आहे हिंदूंवर अशा प्रकारे दबाव टाकला जातोय हे खपून घेतले जाणार नाही पाच आरोपी ताब्यात घेतले असताना अजून दीपक बर्डे हा पोलिसांना कसा सापडत नाही असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.