नेवासा
तालुक्यातील नेवासा फाटा परिसरात असलेल्या त्रिमूर्तीनगर येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान या संस्थेच्या ढोरजळगावने येथील शैक्षणिक संकुलात शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून महाराष्ट्र शासनाने नवीन त्रिमूर्ती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास दि. १ सप्टेंबर
२०२२ च्या शासन निर्णयान्वये अंतिम मंजुरी दिली असल्याची माहिती त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक साहेबराव घाडगे पाटील यांनी दिली.
हे सिनीअर महाविद्यालय वसतिगृहयुक्त राहणार असून गरीब, होतकरू,अनाथ व शेतमजुरांच्या साधारण १०० मुलींसाठी ३ वर्षे भोजन व निवास व्यवस्था मोफत राहणार आहे. ग्रामीण भागातील मुले व मुलींना
उच्चशिक्षणासाठी, खेळांसाठी तसेच स्पर्धा परीक्षांसाठीच्या सर्व शैक्षणिक सुविधा या महाविद्यालयात उपलब्ध करण्यात आलेल्या
आहेत. ढोरजळगावने या गावच्या १५ किमी त्रिज्येमधील शेवगाव तालुक्यातील सर्व गावांमधून विद्यार्थ्यांना अपडाऊन करण्यासाठी संस्था १० बसेसची व्यवस्था करणार आहे. पुणे विद्यापीठाने या महाविद्यालयाची संलग्नता मंजूर केलेली असून प्रवेश देण्याची
प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा सुमतीताई घाडगेपाटील यांनी दिली आहे.