नेवासा फाटा मुकिंदपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

नेवासा फाटा.( मुकिंदपूर )
आज दिनांक 15 ऑगस्ट  2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडा कॉलनी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथे 75वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन  अतिशय उत्साही व आनंदी वातावरणात पार पडला. मुकिंदपूर ग्रामपंचायतचे सरपंच श्री सतीश दादा निपुंगे यांचे वडील माननीय श्री. विष्णू पाटील निपुंगे
ग्रामपंचायतीचे उपसरपंच माननीय श्री. गणेश भाऊ माटे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री दिगंबर कैलास पाटील निपुंगे, उपाध्यक्ष सौ. नम्रता काळे, ग्रामपंचायत सदस्य श्री माऊली देवकाते, श्री अरुण निपुंगे, श्री संजय निपुंगे, गंगाधर निपुंगे, सिताराम निपुंगे, श्रीमती घाडगे मॅडम सर्व ग्रामपंचायत सदस्य व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, मुकिंदपुरचे ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. स्वातंत्र्यदिना निमित्त अनेक मुलांनी भाषण केले. देशभक्तीपर गीत गायन केले. विविध गुणदर्शन स्पर्धेमध्ये प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. शाळेची प्रगती पाहून श्रीमती घाडगे मॅडम यांनी 10खुर्च्या शाळेत भेट दिल्या. श्री अविनाश शेरकर यांनी पाच  हजार रुपये देणगी दिली. तसेच बबलू कुरेशी व अनेक पालकांनी आपापल्या परीने लोकसहभाग जमा केला.कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी श्री. जाधव सर, पदवीधर शिक्षक बर्डे सर व श्री. वनवे सर, श्री सोनकांबळे सर, श्रीम. अवचरे मॅडम, श्रीम. बनकर मॅडम, श्रीम. गायकवाड मॅडम  व श्रीम. बुचुडे  मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन श्री. वनवे सर  यांनी केले.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.