राहुरीच्या न्यायालयात आर्म अॅक्टच्या गुन्ह्यांमधील आरोपींना हजर करण्यासाठी आलेल्या पोलीस अधिकारी व तरुणांमध्ये बाचाबाची होऊन झोंबाझोंबी झाल्याचे बोलले जात आहे.अफगाणिस्तानी धर्मगुरूंच्या हत्या प्रकरणात राहुरीतील सर्जा हॉटेलमध्ये तिघांना दोन गावठी कट्ट्यासह पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके व
पोलीस निरीक्षक दराडे यांच्या सहपथकाने या सराईत आरोपींना जेरबंद करण्यात आले होते.या आरोपींना राहुरी न्यायालयात आणले असता त्यांना श्रीरामपूर येथील काही तरुणांनी भेटण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक सज्जन नाहेडा यांनी या आरोपींना भेटण्यास विरोध केला.यावरून पोलिसांशी तरुणांची चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली.या घटनेमुळे काही काळ न्यायालयाच्या आवारात तणावाचे वातावरण
निर्माण झाले होते. पोलिसांनी तरुणांना समज दिली.
याबाबत केवळ शाब्दिक बाचाबाची झाली, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या बाबतीत मारहाण झाल्याची अफवा असल्याचे सांगितले गेले. याबाबत राहुरी पोलीस स्टेशनला तिघां विरोधात अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.