जळके खुर्द.
नेवासा तालुक्यातील जळके खुर्द येथे रस्त्याचे निकृष्ट काम झाल्यामुळे एका पावसात रस्ता खराब झाला असल्यामुळे खड्डे पडत आहे यामुळे जळके खुर्द येथील हनुमान मंदिर ते जळके खुर्द सोसायटी चे डांबरीकरण चार महिन्यापूर्वी झालेल्या असताना त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे जळके खुर्द येथील सुजान नागरिकांमध्ये या निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करत आहे सदर कामातील चौकशी व्हावी यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते विजय वसंत चावरे व अशपाक भाई पठाण व शकील भाई पठाण इतर ग्रामस्थांनी चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे