कर्जत.
देशामध्ये महिलावर अत्याचार करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढ होत आहे या घटनेमुळे महिलांना जीवन जगणे अवघड झाले आहे यांना रोख लागण्यासाठी अनेक कायदे अमलात आल्यामुळे महिलांचे जीवन सोईस्कर झाले अशीच एक घटना कर्जत तालुक्यातील एका अल्पवयीन
मुलीचे अपहरण करुन अत्याचार झाला होता या अत्याचार करणाऱ्यांना आरोपींना कर्जत न्यायालयाने सक्तमजुरीसह कैदेची शिक्षा सुनावली आहे. फिरोज चाँद
मुलाणी, ओंकार शिवाजी कुलथे, अतुल
बाळू आढाव (सर्व रा. दुरगाव, ता. कर्जत)
अशी या प्रकरणातील आरोपींची नावे
आहेत. कर्जत न्यायालयाचे न्यायाधीश
मुजीब शेख यांनी ही शिक्षा सुनावली.
- मदत करणारांनाही शिक्षा
आरोपीने अल्पवयीन पीडितेला फिर्यादीच्या
कायदेशीर रखवालीतून पळवून नेत
बारामती तालुक्यातील तांदूळवाडी येथे
अत्याचार केला होता. याबाबत फिर्यादी
यांनी कर्जत पोलिसांत फिर्याद दिली होती.
फिर्यादीवरून मुख्य आरोपी फिरोज चाँद
मुलाणी यास २० वर्षे सक्तमजुरी व ५ हजार
रुपये दंड, दंड न भरल्यास ४ महिने साधी
कैद अशी शिक्षा सुनावली आहे. तर त्याला
मदत करणारे आरोपी ओंकार शिवाजी
कुलथे, अतुल बाळू आढाव यांना ३ वर्षे
शिक्षा व हजार रुपये दंड, दंड न भरल्यास
१ महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली
आहे.