नेवासा.
देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त साजरा केला जाणाऱ्या‘आजादी महोत्सवानिमित्त नेवासा येथील बदामबाई विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांची
रॅली काढून जनजागृती केली. या रॅलीमध्ये असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते रॅली ची सुरुवात नेवासा शहरातील बदामबाई हायस्कूल पासून करण्यात आली. सदरच्या रॅलीचे नेतृत्व मुख्याध्यापक विश्वनाथ नाणेकर दहातोंडे सर व सर्व शिक्षकांनी केले. यावेळी निघालेल्या रॅलीत विद्यार्थ्यांनीभारत माता की जय वंदे मातरम आशा घोषणा देत परिसर घोषणाने दुमदुमून टाकला होता बदामबाई शाळेपासून निघालेली रॅली शहरातील बस स्थानक, खोलेश्वर चौक, नगरपंचायत चौक, डॉक्टर हेडगेवार चौक, जुना सेंट्रल बँक, चौक औदुंबर चौक मार्गे श्रीरामपूर रोड पुन्हा बसस्थानकाजवळील शाळेत आल्यानंतर रॅलीची सांगता करण्यात
आली.