अहमदनगर.
अहमदनगर जिल्हा पोलिस दलाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात १ हजार २३ जणांना नोकरी मिळाली आहे. यात मेळाव्याच्या ठिकाणीच ४६० जणांना नियुक्ती पत्र
देण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक
मनोज पाटील यांनी दिली.या मेळाव्यात ५७ कंपन्यांचा प्रतिनिधीनी सहभाग घेतला होता.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस
महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील
यांच्या उपस्थित हा रोजगार मेळावा
झाला. रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी २ हजार ५७२ उमेदवारांची नोंद झाली होती. यातील
१ हजार ८६० जणांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. तसेच अहमदनगर जिल्हा पोलिस दलाच्या वतीनं घेण्यात आलेल्या शरणागती
मेळाव्यात १५५ आरोपींनी शरणागती पत्करल्याची माहिती जिल्हा पोलिसअधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी,
घरफोडी, चोरी, अत्याचार, विनयभंग, गंभीर
दुखापत, फसवणूक आणि इतर गुन्ह्यांतील
आरोपींचा यात समावेश आहे.नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्यासह राजेंद्र काळे, किसन चव्हाण,
अरुण जाधव, साहित्यिक नामदेवराव भोसले, शिवाजी गांगुर्डे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा चे ज्ञानेश्वर शिंदे व अधिकारी तसेच अनेक पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी या मेळाव्यासाठी सहकार्य केलं.