मुंबई.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ
उडालीय. त्यामुळे ठाकरे सरकार सत्तेतून जाणार असल्याचीही शक्यता वर्तवली जाते. मात्र, अशा सर्व गदारोळातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (ता.22) मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्यात
काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ते
पुढीलप्रमाणे:
ठाकरे सरकारचे महत्वाचे निर्णय 2019-20 मध्ये परतफेड केलेल्याअल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50 हजारांपेक्षा कमी असल्यास शेतकऱ्यांना कर्जाच्या मुद्दलाइतकी रक्कम दिली
जाणार आहे. राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी दिलेले अल्प मुदत पीक कर्जच त्यासाठी विचारात घेतलं
जाणार आहे.
आंदोलनातील गुन्हे मागे घेणार
राज्यात राजकीय व सामाजिक आंदोलनकेल्याप्रकरणी 31 डिसेंबर 2021 पर्यंत
दोषारोपपत्र दाखल झाले आहेत, असे खटले मागे घेण्यात येणार आहेत.त्यासाठी पोलिस आयुक्त व
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली क्षेत्रिय
समिती गठीत करण्यास व समितीने त्यावर प्रकरणपरत्वे निर्णय घेण्यास मान्यता दिली आहे.
अर्थात, हे खटले मागे घेताना,
आंदोलनामुळे जीवित हानी झालेली नसावी,खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे5 लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालेले नसावे. या अटी कायम ठेवण्यास
मान्यता देण्यात आली आहे.
अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या
आस्थापनेवरील एकूण 996पदांच्या सुधारितआकृतीबंधात'अपर संचालक' हे नियमित पद
निर्माण करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.
• करमाळा (सोलापूर) येथे दिवाणीन्यायाधीश (वरिष्ठ स्तर), तर कळंब (उस्मानाबाद) येथे जिल्हा व
अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर)न्यायालय स्थापन करणे, त्यासाठी
आवश्यक पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली.
• राज्यात 20 जूनच्याआकडेवारीनुसार 634 गावे व 1396वाड्यांना 527 टँकर्सद्वारेपाणीपुरवठा करण्यात येतो.पावसाला सुरुवात झाल्यानेलवकरच टँकर्स कमी होण्याचीआशा असल्याचे मुख्यमंत्री उद्धव●राज्यातील धरणातील 20 जूनच्याआकडेवारीनुसार 22.32 टक्के
पाणीसाठा आहे. विभागवार पाणीसाठ्यांची आकडेवारी
मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आली.राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे.
सध्या रोज 4000 रुग्ण आढळत आहेत.त्यामुळे मास्क घालणे, आरोग्याचे नियम पाळणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोविडविषयक सादरीकरण करण्यात आले..