नेवासा तहसीलच्या कर्मचाऱ्यावर तहसीलदार यांनी केला गुन्हा दाखल.

नेवासा.
 नैसर्गिक आपत्ती मदत निधी खात्याच्या
चेकवर खाडाखोड करुन तब्बल १६ लाखांवर रकमेचा अपहार केल्याप्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादीवरुन देडगांवचा
कोतवाल अविनाश हिवाळे याच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत नेवासा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की,महाराष्ट्र शासनाकडून नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदतीचे धनादेश संबंधित गावांचे कामगार तलाठी तसेच कोतवालांमार्फत
वितरित केले जातात. तालुक्यातील देडगांव येथील लाभार्थ्याच्या मदतीचे चेक तेथील कोतवाल अविनाश हिवाळे यांच्यामार्फत पाठवण्यात आले होते. मात्र सन २०१९ पासून सदर हिवाळे यांनी
या मदतीच्या चेकच्या नाव, रक्कम व तारखेत खाडाखोड करुन प्रत्यक्षात शेकडा, हजारांत असलेली मदतीची रक्कम खाडाखोड
करुन काही लाखांत करुन ती खऱ्या लाभार्थ्याऐवजी त्यांच्याही नावांत खाडाखोड करुन स्वतःच्या आप्त स्वकियांच्या बँक खात्यात वर्ग करण्याची करामत त्यांनी केल्याचे निदर्शनास आले.
विशेष म्हणजे चेकवरील ही खाडाखोड अधिकृत दिसण्यासाठी तहसीलदारांच्या बनावट सही शिक्क्याचा वापर करुन २०१९पासून वेळोवेळी मिळून हिवाळे याने शासनाच्या नैसर्गिक आपत्ती
मदत निधी खात्यातील तब्बल १६ लाख १४ हजार ७८४ रुपयांचा अपहार केल्याचा आरोप सुराणा यांनी केला आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर हिवाळे याने हा प्रकार स्वतः केल्याची कबुली देत अपहारित रकमेचा भरणा करण्याची तयारी दाखवून
त्यासाठी दोन दिवसांची मुदत मागून घेतल्याचेही त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. परंतु या मुदतीत केवळ ८ लाख ९० हजार १०३रुपयांचा भरणा करुन उर्वरित ७ लाख २४ हजार ६८९ रुपयांचा भरणा करण्यास टाळाटाळ केल्याने तहसीलदार सुराणा यांच्या कायदेशीर फिर्यादीवरुन शासनाच्या निधीचा अपहार करुन फसवणूक व नुकसान केल्याप्रकरणी नेवासा पोलीसांनी अविनाश हिवाळे याच्या विरोधात भादवि कलम ४०८, ४०९, ४२०,४६५.
४६७, ४६८, ४७१, ४७३, ४७७ (अ), ४८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय करे करत आहेत.
दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्याला मोठा कालावधी उलटून जाऊनही तहसीलदार यांनी योग्य वेळी का कारवाई केली नाही ?जनतेचा आपत्तीग्रस्त मदत नैसर्गिक निधी त्यांना आतापर्यंत का मिळवून दिला नाही ? अशा अनेक चर्चांना नेवासा तालुक्यात उधाण आले आहे .संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे टाळून त्याला बेकायदेशीररित्या बचावाची संधी तहसीलदार यांनी का दिली?
असल्याचे नेवासा तालुक्यासह जिल्ह्याच्या महसूल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.