दिल्ली.
दिल्ली येथील भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयात भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत राष्ट्रपती पदासाठीच्या उमेदवाराच्या नावावर विचारमंथन करण्यात आले. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यासह इतर सदस्य उपस्थित होते.या बैठकीत द्रौपदी मुर्मू यांना एनडीएने राष्ट्रपती पदासाठीचा उमेदवार म्हणून घोषीत केले आहे. दरम्यान, या बैठकीत तब्बल २० नावांवर चर्चा झाली. मात्र द्रौपदी मुर्मू यांच्या नावाला पसंती मिळाली आहे.'कोट्यवधी लोकांना, विशेषत: ज्यांनी गरिबीचा अनुभव घेतला आहे आणि ज्यांनी संकटांचा सामना केला आहे, त्यांना श्रीमती द्रौपदी मुर्मू जी यांच्या जीवनातून मोठी शक्ती मिळते. धोरणात्मक बाबींची त्यांचा समज आणि दयाळू स्वभाव यामुळे आपल्या देशाला खूप फायदा
होईल.' असे पंतप्रधान मोदींनी ट्वीट केले आहे.