मुंबई.
नाराज एकनाथ शिंदेंच्या समर्थनातील ३५ आमदारांपैकी एकाची सुटका झाल्याचे वृत्त समोर येत आहे. उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील
असे त्या सुटका झालेल्या आमदाराचे नाव आहे. आमदार कैलास पाटील यांच्या सुटकेचा थरार संजय राऊत यांनी सांगितला आहे.एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर वेगवेगळ्या
वाहनातून आमदारांना जेवन करण्यासाठी जात असल्याचे सांगितले.जेवण करण्यासाठी ठाण्यात जात असल्याचे संबंधित आमदारांना सांगितल्याचे राऊतांनी सांगितले. मात्र ठाणे पार करून पुढे आलो
तरीही गाडी थांबली नाही, म्हणून आमदारांनी विचारणा केली, मात्र पुढे एकनाथ शिंदे थांबले आहेत, त्यांना भेटून पुढे जाऊ, असे सांगितले गेले.
पुढे गुजरात बोर्डर आल्यावर आमदार पाटील यांनी लघुशंकेला गाडी थांबवली. या दरम्यान, कैलास पाटलांना चालू असलेल्या नाट्यमय घडामोडीची चुणूक लागली आणि त्यांनी अंधारात पावसातून तेथून महाराष्ट्राच्या दिशेने निघाल्याची माहिती संजय राऊतांनी सांगितली.