मुंबई.
शिवसेनेत यापूर्वीही बंड झाले होते. त्यात प्रामुख्याने छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे,राज ठाकरे यांच्यासारख्या बड्या नेत्यांचा समावेश होता. मात्र मुख्य ठाणे शहरामध्ये शिंदेसारख्या मोठ्या नेत्याने बंड करणे हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जातो. ठाण्यामध्ये शिवसेनेची ताकद ही मुंबईपेक्षाही अधिक असल्याचे
सांगितले जाते. तसेच ठाण्यात एकनाथ शिंदे हा शिवसेनेचा चेहरा आहे. एकनाथ शिंदे हे यापूर्वीही नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र वेळोवेळी
त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले होते. यंदा चित्र फारच वेगळे दिसत आहे. सध्याच्या घडीला शिवसेनेकडे शिंदेंइतके मोठे नाव ठाणे जिल्ह्यामध्ये नाही. त्यामुळे शिंदेंनीच बंड केल्यास शिवसेनेसाठी पुढील प्रवास
फारच खडतर ठरू शकतो.