नेवासा.
सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय परीक्षेत दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील विद्यालयाचा इयत्ता पाचवीचा विद्यार्थी चि. कैवल्य नवनाथ वनवे याची नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर येथे पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे.तसेच त्याने NSSE परीक्षेत 200 पैकी 188 गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत 5 वा क्रमांक पटकावला. तसेच मंथन टॅलेंट सर्च आयोजित परीक्षेत 300 पैकी 286 गुण मिळवून राज्य यादीत 5 वा क्रमांक पटकाविला. त्याच प्रमाणे महाराष्ट्र गणित प्राविण्य प्रज्ञाशोध परीक्षेत राज्य यादीत 4 था तर अहमदनगर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला. त्याला त्याचे वडील पदवीधर शिक्षक श्री.वनवे सर व वर्गशिक्षक श्री. काकडे सर श्रीम.वनवे मॅडम, श्री घुगे सर, श्री घोलप सर व श्री गटकळ सर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल नेवासा तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती पठारे मॅडम, विस्ताराधिकारी कराड साहेब आणि विद्यालयाचे संस्थापक श्री. साहेबराव घाडगे पाटील, प्राचार्य श्री. सोपानराव काळे सर, विभाग प्रमुख श्री. ताके सर व इतर सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले.