राहूरी.
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीशिवाजी
विद्यानिकेतन, श्रीशिवाजीनगर शाळेतील सध्या कार्यरत तसेच सेवानिवृत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
व कर्मचा-यांना जुन 2010 पासुन ते आजतागयत वेतन न मिळता प्राव्हीडंट फंड भरायचा म्हणून पगारापोटी अल्पशा स्वरुपात अॅडव्हान्स म्हणून रक्कम दिलेली आहे. तसेच संस्थेने प्राव्हीडंट फंडही भरलेला नाही व पगाराची उर्वरीत रक्कमही दिलेली नाही त्यामुळे कर्मचा-यांचे न भरुन येणारे नुकसान झालेले आहे. संस्थेच्या या हलगर्जीपणामुळे जे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत झालेले आहेत त्यांना अद्यापही सेवानिवृती वेतन मिळाले नाही. तरी त्यांना जुन 2010 पासुन ते
आजपर्यतचा थकीत पगार रुपये- 31,32,256 जुन 2010 पासुन ते आजपर्यतचा थकित भविष्य निर्वाह
निधी भरणा रु 15,34,691= तसेच कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना संस्थेत इतरत्र समायोजन या सर्व मागण्यांचा अंमलबजावणी व्हावी. यासाठी
मंगळवारी महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गाने राहुरी
कारखाना येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर वार दिनोंक. २१/०६/२०२२ रोजी
सकाळी १० वाजता आमरण उपोषण करणार आहे त्याची सर्व जबाबदारी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ व प्रशासनावर राहिलं. असे निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर
. खुळे बी. एस. नरोडे व्हि.पी ढाकणे डी. बी. शेख आर. बी.पवार बी एस. तनपुरे डी. व्ही. झावरे व्ही. के. साळुंके एम. बी. म्हसे पी.ई.सरमाने ऐ. जे. आढाव एस. बी शेजवळ एस. बी.आंधळे पी.के. आदींच्या सह्या आहे या निवेदनाच्या प्रती मा. प्राचार्य, श्री शिवाजी विद्यानिकेतन, श्रीशिवाजीनगर
मा. जनरल सेक्रेटरी साहेब, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ
मा. गटशिक्षणाधिकारी साहेब, पंचायत समिती राहुरी
मा. शिक्षणाधिकारी साहेब, (माध्यमिक) सारसनगर अहमदनगर
मा. शिक्षण उपसंचालक साहेब, शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, शिवाजी नगर
मा. शिक्षण सचीवालय, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई- ३२) मा. कार्यकारी अधिकारी साहेब, जिल्हा परिषद, अहमदनगर
मा. जिल्हा अधिकारी साहेब, अहमदनगर
मा. जिल्हा पोलिस प्रमुख साहेब, अहमदनगर
) मा. शिक्षण मंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई - ३३
मा. प्राजक्तदादा तनपुरे साहेब, मंत्री महाराष्ट्र राज्य
मा. तहसीलदार साहेब, राहुरी
मा. पोलिस निरीक्षक साहेब, राहुरी
मा. आमदार साहेब, श्रीरामपूर
मा सहाय्यक आयुक्त नाशिक
कर्मचारी
भविष्य निर्वाह निधी कार्यालय
१८५ मा. उप. आयुक्त भविष्य निर्वाह निधी कार्यालय अहमदनगर. अशा विविध कार्यालयांना देण्यात आले आहे .